कोरेगाव: कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथे कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या माकडाला जागरूक युवकांनी दिले जीवदान
कोरेगाव रहिमतपूर रस्त्यावर सहा किलोमीटर अंतरावर दक्षिणेस असलेल्या शिरंबे गावामध्ये बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका घराच्या कौलारू घरावरून जमिनीवर खाली पडलेल्या माकडाला मोकाट कुत्र्यांनी गंभीर जखमी केले. मात्र स्थानिक जागरूक युवकांनी तातडीने कुत्र्यांना हुसकावून लावले आणि माकडाचा जीव वाचविला. तेथे उपस्थित असलेल्या दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने समय सूचकता दाखवत माकडाची जखम स्वच्छ करून औषधोपचार केला. त्यानंतर वन विभागाने या माकडाला अधिक उपचारासाठी सातारा येथे नेले आहे.