महाबळेश्वर: ऐतिहासिक किल्ले प्रतापगड भव्य ३६६ मशालीनी उजळला; सर्वांच्या डोळ्यांना आनंद देणारे दृष्य
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या इतिहासातील असंख्य घटनांचा साक्षीदार असलेला प्रतापगड किल्ला पावसाळ्यात नवरात्री उत्सव निमित्त रविवारी पहाटे पाच वाजता ३६६ मशालींनी उजळला. सर्वांच्या डोळ्यांना आनंद देणारे दृष्य होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड किल्ला ३६६ मशालींच्या प्रकाशाने प्रकाशित करण्यात आला. या किल्ल्यावर असलेल्या भवानी माता मंदिराच्या ३५० व्या वर्धापन दिनानिमित्त नवरात्रीत मशाली पेटवण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती.