मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने भाजपमधील हलबा समाजाच्या माजी नगरसेवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. प्रभाग २० मधील माजी नगरसेवक भास्कर पराते यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, पक्षातील नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.काही नेत्यांनी जाणीवपूर्वक आपली उमेदवारी कापल्याचा आरोप पराते यांनी केला आहे.