कोरेगाव: अतिवृष्टीग्रस्त-पूरग्रस्तांना मदतीसाठी माथाडी कामगार एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार :आ. शशिकांत शिंदे
देशावर,महाराष्ट्र राज्यावर संकट आल्यावर माथाडी कामगार कायम पाठीशी उभा राहिला आहे. अख्या महाराष्ट्रातील माथाडी कामगार या वेळी महाराष्ट्रातील अतिवृष्टी ग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. एक दिवसाचा पगार आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार आहोत, अशी घोषणा माथाडी कामगार नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केली. कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त तुर्भे, नवी मुंबई येथे माथाडी कामगारांचा मेळावा गुरुवारी सकाळी ११ वाजता झाला.