भुसावळ नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल दि. 21 डिसेंबर रोजी लागला. सकाळी दहा वाजेपासून निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्या असून त्यांना 42 हजार 234 मते मिळाली आहेत.