चंद्रपूर: शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख कामगार नेते यांची
माणिकगड सिमेंट कंपनीतील प्रशासन विरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कामगार नेते बंडू हजारे यांनी सुरक्षा रक्षक याना न्याय मिळावा म्हणून कायदेशीर रित्या केंद्रीय कामगार सहाय्यक आयुक्त/महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ यांच्याकडे दाद मागितली असता केंद्रीय सहाय्यक आयुक्त यांनी कामाचे तास ८ तास करून दिले परंतु मग्रूर माणिकगड कंपनी चे हेड विनय कौशिक यांनी अजूनही त्याना किमान वेतन कायद्यानुसार पगार देत नसल्याने आज दि. १६ सप्टेंबर ला 1 वाजता रोजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांनी चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखा येथे तक्रार केली आहे.