लोकशाहीची जाणीव आणि आदर लहान वयातच रुजावा आणि त्यातून पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे मतदान जनजागृतीचा ‘प्रिय आई–बाबा, पत्रास कारण की…’ हा आगळा–वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.