केज: शेतातून घराकडे येत असलेल्या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अपहरण, केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वडिलांना शेतात जेवण देऊन घराकडे परत येत असलेल्या एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञाताने तोंड दाबून तिचे अपहरण करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अपहरण झालेल्या मुलीने केज शहर जवळ येताच आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्याने तिला रस्त्यात सोडून पळ काढल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे बुधवारी मुलगी वडिलांना शेतात जेवण देऊन घराकडे परत येत होती.