अकोट: गजानन महाराज मंदिर सह शहर व तालुक्यातील विविध मंदिरांवर दिवाळीनिमित्त करण्यात आली आकर्षक सजावट
Akot, Akola | Oct 20, 2025 भारतातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीचा उत्साह शहर व तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे अकोट शहरातील गजानन महाराज मंदिर तसेच तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये दिवाळी सण निमित्त आकर्षक सजावट करण्यात येऊन सर्वत्र पान फुलं तोरण सजावट करण्यात आलीय.मंदिरांमध्ये सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे तसेच संपूर्ण शहरात देखील ठिकठिकाणी दीप प्रज्वलित करून दिपोत्सव उल्हासात साजरा होत असल्याने मंदिरांवर देखील दिपौत्सवाचा आनंद झगमगून दिसत आहे.