केंद्रीय ग्रामविकास मंत्री मा. श्री. शिवराज सिंह चौहान साहेबांची भेट घेऊन अहिल्यानगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांच्या गंभीर प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. PMGSY-IV अंतर्गत २५० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अनेक सर्वसाधारण (General) गावांना व वाड्या-वस्त्यांना आजही पक्क्या रस्त्यांची जोडणी नाही. रस्ते नसल्याने दैनंदिन प्रवास, आरोग्यसेवा, शिक्षण, बाजारपेठ व शेतीकामांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणी येत आहेत. हा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक आहे.