नाशिक: गंगापूर गाव येथे आ. सीमा हिरे यांचे हस्ते सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा पडला पार
Nashik, Nashik | Sep 27, 2025 गंगापुरगाव येथील मनपाच्या जागेवर आमदार सीमा हिरे यांचे निधीतून ७० लाख रुपये उपलब्ध करून सामाजिक सभागृहाचे बांधकाम तसेच पेव्हर ब्लॉक बसविण्याचे लोकार्पण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला.यावेळी मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हा उपक्रम ग्रामस्थांना सुलभता, सामुदायिक सुविधा आणि सामाजिक कल्याण वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, याचा विश्वास आ. हिरे यांनी व्यक्त केला.