अकोला: दिवाळी बाजारासाठी महापालिकेचे विशेष नियोजन; दोन ठिकाणी विक्रीची व्यवस्था
Akola, Akola | Oct 19, 2025 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अकोला महापालिकेने यंदा दिवाळी बाजाराचे विशेष नियोजन केले आहे. मूर्ती विक्रीसाठी भाटे क्लब मैदान, तर इतर साहित्य विक्रीसाठी रिझर्व्ह माता मंदिर परिसर निवडण्यात आला आहे. यामुळे बाजाराची गर्दी विभागली जाऊन मुख्य रस्ते मोकळे राहतील. दोन्ही ठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध असणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. महापालिकेच्या बाजार विभागाने १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता ही माहिती दिली.