वरोरा: वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या CSR फंडातून शेतकरी, अपंग व विधवा महिलांना मदतीची हात द्या ;दिलीप गिरसावळे यांची मागणी
खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. बल्लारपूर क्षेत्राच्या CSR फंडातून शेतकऱ्यांना फवारणी पंप, अपंग व्यक्तींना आवश्यक साहित्य व विधवा महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी आज दि 8 नोव्हेंबर ला 12 वाजता भाजपचे तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे यांनी केली आहे.