परळी: तालुक्यातील शिरसाळ्याची केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
Parli, Beed | Nov 7, 2025 शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याचे काम ग्लोबल विकास ट्रस्टने केले असून या ट्रस्टचे काम संपूर्ण हिंदूस्थानात घेवून जाणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी म्हंटले. ते बीड जिल्ह्यातील सिरसाळा या ठिकाणी ग्लोबल विकास ट्रस्टचे मयंक गांधी यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. तत्पुर्वी शिवराज चौहान यांनी सिरसाळ्या पासून जवळ असलेल्या एका शिवमंदिरात जावून रूद्राभिषेक केला व देशवासियांचे कल्याण सुख समृद्धी, खुशहालीची कामना केली. व शेतकऱ्यांशी संवाद साधला