पालघर: विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, २२७८ मतदान केंद्रासाठी सुमारे १२ हजार ४२२ निवडणूक कर्मचारी राहणार कार्यरत
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात २२७८ मतदान केंद्रावर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी किमान १२ हजार ४२२ निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मतदान कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण 19 नोव्हेंबर रोजी विधानसभा मुख्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासने अनेक जनजागृती कार्यक्रम सुरू ठेवले असून जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.