साक्री: दारखेल येथे बिबट्यास रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडल
Sakri, Dhule | Oct 12, 2025 पिंपळनेर वनविभागातर्गत असलेल्या दारखेल येथे नागरी वस्तीतील जनावरांच्या गोठ्यात अडकून पडलेल्या बिबट्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद करून नैसर्गिक अधिवास क्षेत्रात मुक्त करण्यात आले. गोठ्यातील म्हशीच्या रेडकूला बिबट्याने फस्त केले होते. वन परिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे रेस्क्यू केले. वनपाल रामदास चौरे, वनरक्षक अनिल घरटे, दीपक राठोड, वरूणराज माळी, अमोल पवार, राकेश पावरा,