जालना: जालना शहरातील सराईत गुन्हेगारांची पोलिसांकडून ओळख परेड; अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांचा इशारा
Jalna, Jalna | Jun 9, 2026 जालना शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंगळवार दि. 9 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शहरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांची अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या उपस्थितीत ओळख परेड घेण्यात आली. यावेळी गुन्हेगारांना पुन्हा कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी झाल्यास थेट कारागृहाची हवा खावी लागेल,असा सज्जड इशारा देण्यात आला.