अकोट: कालवाडी परिसरातील शेतपंपाचा 3 महिन्यापासून वीज पुरवठा बंद;शेतकऱ्यांचे महावितरणला निवेदन
Akot, Akola | Nov 7, 2025 कालवाडी शिवारातील शेतकऱ्यांनी लाखो रुपये भरून वीज पंप घेतलेले आहेत. परंतु मागील तीन महिन्यापासून वीज पुरवठा बंद आहे.कित्येक बोरवेल तांत्रिक अडचणीमुळे बंद आहेत .कित्येकदा गावाच्या प्रभारी कडे तक्रारी केल्या परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे गावातील सर्व शेतपंपधारक या समस्येमुळे त्रस्त आहेत .तसेच तसेच वीज पुरवठा संदर्भात कोणतीही तक्रार करायची असल्यास मुंडगाव येथे जावे लागते .त्यामुळे सर्व शेतकरी त्रस्त आहेत.वरिष्ठांनी दखल घ्यावी असे निवेदन शेतकरींनी महावितरणला दिले आहे.