वसई: नागिनदास पाड्यातील यादव चाळ येथे राहणाऱ्या घनश्याम परमार यांनी पत्नीसोबत झालेल्या भांडणामुळे केली आत्महत्या
Vasai, Palghar | Apr 23, 2024 नागिनदास पाड्यातील यादव चाळ येथे राहणाऱ्या घनश्याम परमार (४०) यांनी शनिवारी सकाळी आत्महत्या केली. पत्नीसोबत झालेल्या भांडणामुळे नैराश्येच्या भावनेतून त्यांनी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.