जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील गणेशपीपरी गावाच्या शेतशिवारात आज दि.26 ऑक्टोबर ला सायंकाळी 5 वाजता वाघाच्या हल्ल्यात अल्काताई पांडुरंग पेंदोर (वय 45) या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.