परभणी: रस्त्यावरील खड्डे व उघड्या गटारांमुळे झालेल्या अपघातग्रस्तांना मिळणार भरपाई : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
रस्त्यावरील खड्डे व उघड्या गटारांमुळे (मॅनहोल) झालेल्या मृत्यू वा दुखापतीच्या घटनांबाबत आता पीडितांना आर्थिक मदतीचा दिलासा मिळणार आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल पीआयएल क्र. ७१/२०१३ (PIL No. 71/2013) मधील मा. न्यायालयाचे आदेशानुसार रस्त्यावरील खड्डे व उघड्या गटारांमुळे (मॅनहोल) झालेल्या मृत/दुखापग्रस्त व्यक्ती/कायदेशीर वारसांना दुखापतीच्या प्रकरणात ५०,००० ते २,५०,००० व मृत व्यक्तीच्या बाबतीत ६,००,००० रुपये भरपाई देणे संदर्भात नागरी क्षेत्रामध्ये संबधीत नागरी स्थानिक स्वराज्य