श्रीवर्धन: रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांचा दक्षिण रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याचा व्यापक संघटनात्मक दौरा
आज गुरुवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांनी दक्षिण रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याचा व्यापक संघटनात्मक दौरा केला आणि तो मोठ्या उत्साहात पार पडला. या दौऱ्याचा उद्देश जिल्ह्यातील महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याची प्रगती तपासणे, कार्यकर्त्यांच्या बांधिलकीचा आढावा घेणे आणि आगामी कार्ययोजनांची आखणी करणे हा होता. विविध मंडळांतील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून स्थानिक पातळीवर चालणाऱ्या उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. संघटनाची घडी अधिक मजबूत करण्यासाठी नव्या सदस्यांचा सहभाग वाढविण्याचे मार्गदर्शन देण्यात आले. महिला कार्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगून संघटनशक्ती, शिस्त आणि कार्यनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. जिल्ह्यातील आगामी कार्यक्रम, ,महिलांच्या स्थानिक प्रश्नांवर प्रभावी काम करण्यासाठी दिशा व मार्गदर्शन देण्यात आले.