22 जानेवारीला दुपारी 4 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, उपराजधानीतील जरीपटका पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक आणि खळबळ जनक घटना समोर आली आहे येथे पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपीने पोलीस कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना उघडकीस येताच पोलीस विभागात एकच धावपळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे.