आज अंगारकी चतुर्थीनिमित्त नागपूरचे श्रद्धास्थान आणि विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या प्राचीन स्वयंभू श्री गणेश मंदिर (टेकडी गणपती) येथे भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असल्याने दर्शनासाठी भाविकांनी पहाटे ३ वाजल्यापासूनच मंदिर परिसरात गर्दी केली आहे.भक्तीचा उत्साह आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष पहाटेच्या सुमारास बाप्पाची विधिवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला.