22 डिसेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद पिंगे हे एस जी एस टी कार्यालय येथे अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान आरोपी ग्लोबल चे संचालक लड्डू खान, सावलिया इंटरप्राईजेस चे मालक चंद्रपाल नान्हे व एक अज्ञात आरोपी यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट सादर केला व शासनाची 25 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.