नांदेड: विष्णुपुरी धरणाचे यावर्षी पहिल्यांदाच 12 दरवाजे उघडण्यात आले प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदी काठच्या गावकऱ्यांना इशारा
Nanded, Nanded | Sep 15, 2025 आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी अकराच्या दरम्यान विष्णुपुरी धरणाचे यावर्षी पहिल्यांदाच 12 दरवाजे उघडण्यात आले विष्णुपुरी धरणात पाण्याचे आवक वाढल्याने विष्णुपुरी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला असून, खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले होते त्यानंतर आज अकराच्या दरम्यान पाण्याची आवक वाढल्यामुळे विष्णुपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले सध्या गोदावरी नदीपात्रात 1 लाख 13570 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे.