नांदेड: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. खासदार रवींद्र चव्हाण यांची वसंत नगर येथे प्रतिक्रिया
Nanded, Nanded | Sep 15, 2025 आज दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले 2010 नंतर कोणता एव्हढा त्रास दिला हे अशोक चव्हाण यांनी जगजाहीर सांगावे. 2010 नंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष केले, बांधकाम मंत्री केले, तरीही असे वक्तव्य करत असतील तर काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत, जश्यास तसे उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिलाय. 2010 नंतर मला खूप त्रास दिला असे वक्तव्य काल लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले