परळी: भाषण करायचं म्हटलं की अंगावर काटा येतो, माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी परळीत व्यक्त केले मत
Parli, Beed | Oct 26, 2025 परळी येथे आयोजित कार्यक्रमात माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी संवाद साधताना एक भावनिक विधान केले. त्या म्हणाल्या, "भाषण करायचं म्हटलं की मला अंगावर काटा येतो. काय बोलावं हेच मला समजत नाही. खरं सांगायचं तर आता भाषण करण्याची सवयच तुटली आहे." त्यांनी पुढे सांगितले, "मी माझ्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात कधीही कोणत्याही कामात कूचराई केलेली नाही. पण जेव्हा मंचावर उभं राहून बोलायची वेळ येते, तेव्हा मात्र मनात एक वेगळी धडधड निर्माण होते."