तिरोडा: आमदार विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत तिरोडा नगरपरिषद निवडणुकीत नुक्कड सभांना मोठा प्रतिसाद
Tirora, Gondia | Nov 29, 2025 आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आज तिरोडा शहरात विविध प्रभागांमध्ये प्रचार मोहिमेअंतर्गत नुक्कड सभांचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. या प्रचार मोहिमेला स्थानिक आमदार विजय रहांगडाले यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.आमदार रहांगडाले यांच्या उपस्थितीमुळे या नुक्कड सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला. सभांमध्ये उपस्थितांमध्ये उत्साह, विश्वास आणि विकासाची उमेद स्पष्टपणे दिसून येत होती.