भद्रावती: वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू.
भामडेळी येथील घटना.
शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर जवळच दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन त्याला ठार केल्याची घटना दिनांक २४ रोज बुधवारला सकाळी ११वाजताच्या सुमारास तालुक्यातील भामडेळी येथे घडली. अमोल नन्नावरे, वय३८ वर्ष, राहणार भामडेळी असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटनेमुळे परीसरातील गावकरी तथा शेतकऱ्यांमधे भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.