गडचिरोली: 19 सप्टेंबरला जनसंवाद धम्म ध्वज यात्राचे गडचिरोलीत आगमन
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी दि. १९ सप्टे. २०२५ ला सायं. ४.०० वाजता इंदिरा गांधी चौकातील राजीव भवनमध्ये जनसंवाद धम्म ध्वज यात्रा येत आहे. सायं. ४.०० ते ६:०० वाजेपर्यंत सुप्रसिद्ध गायक विकास राजा व सुभाष कोठारे यांचा प्रबोधनात्मक भिम गितांचा कार्यक्रम आहे. त्यानंतर धम्म ध्वज यात्रेला येणारे पुज्य भंते रेवत संघनायक भारत, पुज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो, पुज्य भदंत हर्षबोधी महास्थवीर, पुज्य भंते अशोक लामा, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.