आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या 'ना-हरकत' प्रमाणपत्राची प्रक्रिया सध्या चर्चेत आहे. नागपूर महानगरपालिकेकडे आतापर्यंत एकूण ३,२३३ अर्ज प्राप्त झाले आहेत.मनपा प्रशासनाने अर्जांची छाननी केल्यानंतर आतापर्यंत २,८३७ उमेदवारांना यशस्वीरित्या 'ना-हरकत' प्रमाणपत्रे वाटप केली आहेत. मात्र, ३९६ इच्छुकांना मनपाच्या नियमांचा फटका बसला आहे.