जालना: शनी मंदिर चौक ते एस.बी. हायस्कूल मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी..
Jalna, Jalna | Jun 21, 2026 शनी मंदिर चौक ते एस.बी. हायस्कूल मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी.. आज दिनांक 21 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शनी मंदिर चौक ते एस.बी. हायस्कूल या मुख्य मार्गावर ‘अवजड वाहनांना प्रवेश बंद’ असतानाही सर्रास अवजड वाहने आणि इतर चारचाकी वाहने रस्त्यावर दिसून येत आहेत. नियमांचे उल्लंघन होत असल्याने या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरील काह