पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण १२८ जागांपैकी भाजपाचे ८४ उमेदवार विजयी होत पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ उमेदवार विजयी झाले असून, पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर शिवसेनेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले.