मोहाडी तालुक्यातील मौजा वरठी येथे राहणारे रेल्वेचे निवृत्त कर्मचारी अशोक सोमाजी तितीरमारे (वय ६१) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घर बांधकामासाठी घेतलेले ₹५ लाख (पाच लाख) रुपयांचे कर्ज फेडता न आल्याने ते गेल्या काही दिवसांपासून अत्यंत तणावात होते आणि त्यांनी व्यवस्थित जेवणही सोडले होते. दि. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११:४० वाजता दरम्यान त्यांचा मुलगा, अजित अशोक तितीरमारे (वय २२), घरी परतला असता त्यांना त्यांचे वडील पडलेल्या अवस्थेत दिसले, त्यांच्या नाकातून फेस येत होता