सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील वकिलांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करून तीव्र संताप व्यक्त केला. जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत म्हटले की, “न्यायव्यवस्थेवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. अशा प्रकारच्या घटना देशाच्या न्यायसंस्थेचा अपमान करणाऱ्या आहेत.”