23 फेब्रुवारीला सकाळी सात वाजताच्या दरम्यान देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना जबलपूरकडून नागपूरकडे येणाऱ्या एका टाटा इंट्रा वाहन क्रमांक एम पी 28 जी 55 44 ला देवलापर येथील जुन्या पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी करून अडविले असता वाहन चालकाने पोलिसांना बघून काही अंतरावर वाहन थांबून वाहन सोडून पळ काढला. यात वाहनातील नऊ गोवंशांची सुटका करण्यात येऊन एका आरोपीला अटक करण्यात आली.