नागपूर शहर: महाल रोडवरील इलेक्ट्रिकच्या दुकानात चोरी करणाऱ्या स्पायडर मॅनला अटक
30 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कोतवाली हद्दीतील माधव इलेक्ट्रिकल्स च्या दुकानातून बारा लाख रुपये रोख चोरून नेणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा घरफोडी विरोधी पथकाने अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव राम उर्फ स्पायडरमॅन मडावी असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून तीन गुन्ह्यांचा खुलासा करण्यात आला. तसेच आरोपीने शेगाव येथे मंदिराजवळ दोन लाख रुपयांची घरफोडी केल्याचे ही सांगितले. आरोपीला पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.