पाचोरा: वडगाव (कडे) , शिंदाड, वाणेगाव, निंभोरी राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे, पिंप्री या गावांमध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस,
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर सलग दुसऱ्या या परिसरातील वडगाव (कडे) , शिंदाड, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे, पिंप्री या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून दगडी नदीसह परिसरातील नदी नाल्यांना आज दिनांक 16 सप्टेंबर च्या मध्यरात्रीत पूर आल्याने अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तसेच सातगाव डोंगरी परिसरातील रस्त्याचा संपर्कही तुटला आहे.