तुमसर: खापा येथे चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी आरोपी, चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
तुमसर भंडारा राज्य महामार्गावरील खापा येथे दि.1 डिसेंबर रोज सोमवारला सकाळी 9 वा.च्या सुमारास जखमी फिर्यादी अरविंद संपत बांते रा.भोजापूर हा आपल्या दुचाकीने रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या चाकीवाहन क्र.MH 12-3675 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून अरविंद बांते याच्या दुचाकीला जबर धडक देत पसार झाला. यात अरविंद बांते याला गंभीर दुखापत झाली. यावेळी पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून पसार चारचाकी वाहन चालकाविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.