नागपूर शहर: वायुसेना कार्यालयाच्या बाहेर आढळला 'उडणारा साप ', परिसरात उडाली खळबळ
नागपूर वायुसेना कार्यालयाच्या बाहेर उभे असलेल्या एका गाडीतून दुर्मिळ प्रजातीचा उड्या मारणारा साप बाहेर पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या सापाला पाहून कार्यालयीन कर्मचाऱ्यांची तेथे गर्दी जमली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती सर्पमित्र शुभम जीआर यांना देण्यात आली. माहिती मिळताच शुभम घटनास्थळी तात्काळ पोहोचले आणि त्यांनी त्या सापाला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. नंतर या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.