अकोला: जागतिक एड्स दिनानिमित्त भव्य सायक्लोथॉनचे आयोजन! ७०० विद्यार्थ्यांचा राहणार सहभाग
पत्रकार परिषदेत आयएमएची माहिती
Akola, Akola | Nov 28, 2025 जागतिक एड्स दिनानिमित्त ३० नोव्हेंबर रोजी आयएमए अकोला, जिल्हा आरोग्य विभाग व सामाजिक संस्था संयुक्त विद्यमाने भव्य सायक्लोथॉन आयोजित केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातून प्रारंभ होणारी रॅली शहरातील ८ किमी अंतर पूर्ण करेल व जीएमसी येथे समाप्त होईल. ६००–७०० विद्यार्थी सहभागी होणार असून सुरक्षित व्यवहार, वेळेवर तपासणी व नियमित उपचार यांचा जनजागृतीसाठी हा उपक्रम आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना व पोलीस अधीक्षक अर्चित चांडक रॅलीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नोंदणी विनामूल्य आहे. अशी माहिती आय ए