नांदेड: गोवर्धन घाट येथील समशानभूमी पाण्यात गेल्याने शहरातील मयत झालेल्या व्यक्तींना अंत्यविधीसाठी सिडको येथे नेण्याची वेळ आली
Nanded, Nanded | Sep 16, 2025 आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी 1च्या दरम्यान गोवर्धन घाट येथील समशान भूमी पाण्याखाली गेल्याने शहरातील मयत झालेल्या व्यक्तींना अंत्यविधी साठी सिडको येथील समशानभूमीमध्ये नेण्याची वेळ आली आहे विष्णुपुरी धरण तुडुंब भरून वाहत आहे. विष्णुपुरी धरण शंभर टक्के भरल्याने विष्णुपुरी धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीला पूर आला आहे. गोवर्धन घाट येथील स्म्शान भूमी पाण्याखाली गेली आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला