पश्चिम आशियाई देशातील युद्धामुळे देशात पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये तणाव वाढत आहे. त्यातच घरगुती गॅसचे दर वाढण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी तणाव वाढत आहे. रायगड जिल्ह्यातही याचा परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही पेट्रोल पंप आणि घरगुती गॅस वितरकाकडे नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.