जालना: जालन्याचा रिल्स स्टार अरुण जाधव व सुनीता जाधव यांना महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
Jalna, Jalna | Apr 16, 2026 जालन्याचा कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रिल्स स्टार अरुण भिकराम जाधव व सुनीता अरुण जाधव यांना “महाराष्ट्र नायक” राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाज प्रतिबिंब बहुउद्देशीय संस्था, अमरावती, बी.एस.एफ बहुउद्देशीय संस्था, संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा आणि उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील सामाजिक, कृषी, क्रीडा, उद्योग, शैक्षणिक, प्रशासकीय व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्