गडचिरोली: शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंपर्क भगवा अभियानात महिला-पुरूषांनी बांधले शिवबंधन,मुलचेरात सभासद नोंदणीसह पक्षप्रवेश पार पडला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या शिवसंपर्क भगवा सप्ताह अभियानात मुलचेरा येथे झालेल्या कार्यक्रमात शेकडो शिवसैनिकांनी शिवबंधन बांधून घेतले.पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या नेतृत्वात हे शिवसंपर्क अभियान सुरू आहे.