माजलगाव: टाकरवन येथे ऊस पिकाला भीषण आग लागली असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले
माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे शेतकऱ्यांच्या ऊसपिकाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तब्बल दोन एकरांवरील ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळावर ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या आगीमुळे शेतकऱ्यांना लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे आणि गलथान कारभारामुळे ही आग लागली.