पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी कळंबोलीतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार दौरा केला. प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजप महायुतीकडून रामदास शेवाळे, बबन मुकादम ,बायजा बारगजे,सायली सरक यांच्यासह चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागरिकांशी संवाद साधला.