शेतकऱ्यांच्या हक्काच्या खताची अवैध विक्री करणाऱ्या खत माफियांना जळगाव जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने मध्यरात्री मोठा दणका दिला आहे. भडगाव परिसरातून २५ टन युरियाची बेकायदेशीर तस्करी करण्याचा प्रयत्न कृषी पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता उधळून लावला.