देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदिर येथे प्रचार गाडीचे पूजन करून श्री बालाजी यात्रा उत्सवाच्या प्रचारार्थ प्रचार गाडी मराठवाड्याकडे रवाना
देऊळगाव राजा दिनांक १७ सप्टेंबर दुपारी १ वाजता शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या प्रचारासाठी श्री बालाजी मंदिर येथे प्रचार गाडीचे पूजन करून यात्रा उत्सव प्रचार गाडी मराठवाडा कडे प्रचारासाठी रवाना झाली .श्री बालाजी संस्थांनच्या वतीने दरवर्षी मराठवाडा येथे श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव प्रचारार्थ श्री संस्थांनच्या वतीने गाडी रवाना करण्यात येत असते .उत्सवाची 400 वर्षाची परंपरा आजही श्री संस्थान जोपासत आहे